सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे आणि आपल्यावरील सामाजिक ऋणांतून अंशतः मुक्त होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून विवेकानंद सेवा मंडळ दरवर्षी ऋणमोचन भेट व झेप उपक्रमाचे आयोजन करतो.
या वर्षी आपण चालतवड इथे वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहास भेट देणार आहोत. ह्या भेटी अंतर्गत आपण वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची वर्षभराची अन्नाची व इतर गोष्टींची सोय करणार आहोत.
तसेच दर वर्षीप्रमाणे आपण वनवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना झेप प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक मदत करणार आहोत.
या उपक्रमामध्ये सहभागी व्हावयाचे असल्यास कळवावे.
देणगी देताना देणगीदाराचे नाव व फोन नंबर आवर्जून कळवावा. सद देणगीसाठी देणगीदाराला 80G चा फायदा मिळेल. म्हणजेच आपण दिलेल्या देणगीसाठी आपल्याला करामध्ये सवलत मिळेल.
वसतिगृहात लागणाऱ्या वस्तू आपण वस्तूस्वरूपात मंडळामध्ये देऊ शकता. आवश्यक वस्तूंची यादी ह्या मेसेज बरोबर जोडीत आहे. आपण ह्यासाठी इच्छुक असल्यास आम्हाला कळवावे.
स्थळ : वनवासी कल्याण आश्रम वसतिगृह, चालतवड
दिनांक : २६-२७ ऑगस्ट २०२३
सम्पर्क:
अक्षत गोखले- ८४२५८१५०१०
निनाद जोशी - ८०९७९८१९४२
VSM Beneficiaries
Male
Female
Children
Thane
Mumbai
Raigad
Palghar
Pune
Aurangabad
Jalgaon
Goa
Nashik
Ahmedabad
Others